

Tilak Varma
esakal
Tilak Varma unbeaten 136 off 56 balls in TG20: भारताचा टी-२० उपकर्णधार तिलक वर्मा(Tilak Varma) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकांपूर्वी त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या टीजी२० अर्थात तेलंगणा प्रीमियर लीगमध्ये त्याने अवघ्या ५६ चेंडूंमध्ये नाबाद १३६ धावांची तुफानी खेळी करत मेडक फाल्कन्सला वारंगल वॉरियर्सविरुद्ध तीन गडी राखून रोमांचक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवसापूर्वीच दाम्बुला येथे भारत अ संघाला त्रिदेशीय मालिकेचे विजेतेपद मिळवून देण्यातही तिलक वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली होती.