IND A vs PAK A: "साथ दिली असती, तर मी सामना संपवला असता..." तिलक वर्माने पाकविरुद्ध हरल्यानंतर सांगितलं कुठे फसला डाव

Tilak Varma on India A's close defeat against Pakistan A: भारतीय अ संघाला पाकिस्तान अ संघाविरुद्ध रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत रविवारी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार तिलक वर्माने भारतीय संघाकडून काय चूक घडली, यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Tilak Varma | India A vs Pakistan A | Rising Stars Asia Cup2026

Tilak Varma | India A vs Pakistan A | Rising Stars Asia Cup2026

Sakal

Updated on: 

India A vs Pakistan A, Rising Stars Asia Cup2026: रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ या कट्टर प्रतिस्पर्धी संघात रविवारी (२२ नोव्हेंबर) सामना पार पडला. या सामन्यात भारतीय अ संघाला ४८ धावांनी निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला.

अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकानंतर तिलक वर्मा आणि शाहबाज अहमदने झुंज दिली, पण त्यांची झुंज तोकडी पडली. तिलकचेही शतक व्यर्थ ठरले. या सामन्यानंतर तिलक वर्माने (Tilak Varma) स्पष्ट शब्दात तिखट प्रतिक्रिया देत त्याला इतर भारतीय फलंदाजांकडून साथ मिळाली नसल्याचे सांगितले.

Tilak Varma | India A vs Pakistan A | Rising Stars Asia Cup2026
INDA vs PAKA सामन्यात राडे! वैभवला डिवचलं, हर्षित राणालाही आक्रमक सेंडऑफ, तर तिलकशीही पाकिस्तानी खेळाडू भिडले; Viral Video
Loading content, please wait...