

Heated on-field exchanges erupt between India A and Pakistan A players
Sakal
Rising Stars Asia Cup, India A vs Pakistan A Controversy: रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ संघाला रविवारी (२२ नोव्हेंबर) पाकिस्तान अ संघाविरुद्ध ४८ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पराभव झाला असला, तरी अद्याप भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे.
तथापि, हा सामना मैदानात खेळाडूंमध्ये झालेल्या वादामुळेही बराच चर्चेत राहिला. पाकिस्तानी खेळाडूंनी गोलंदाजीवेळी आक्रमकपणा दाखवल्याने अनेकदा त्यांची भारतीय खेळाडूंसोबत शाब्दिक चकमक घडली. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.