
India vs England 2nd T20I: भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात २ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. भारताच्या या विजयात तिलक वर्माने शानदार नाबाद अर्धशतक ठोकत मोलाचा वाटा उचलला. यासह त्याने एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.
या सामन्यात इंग्लंडेने ठेवलेलं १६६ धावांचं लक्ष्य भारताने १९.२ षटकात ८ विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी तिलकने ५५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या आहेत. तिलक या सामन्यातील सामनावीरही ठरला.