न्यूझीलंडचा टीम सेईफर्टने CPL 2025 मध्ये ४० चेंडूंत शतक झळकावत आंद्रे रसेलच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सेईफर्ट ५३ चेंडूत १२५ नाबाद धावा ठोकून सेंट ल्युसिया किंग्सला १७.५ षटकांत विजय मिळवून दिला.
त्याच्या डावात १० चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता; फक्त १९ चेंडूत १०४ धावा चौकार-षटकारांतूनच आल्या.
CPL 2025 St Lucia Kings vs Antigua Falcons Tim Seifert hundred : न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टीम सेईफर्टने कॅरिबियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ३० वर्षीय फलंदाजाने ४० चेंडूंत शतक पूर्ण करून CPL च्या इतिहासातील सर्वात जलद शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. सेंट ल्युसिया किंग्स आणि अँटिग्वा अँड बर्बुडा फॅलकोन्स यांच्यातल्या सामन्यात हा वादळी खेळ पाहायला मिळाला.