TNPL 2025 Filding BlunderSakal
Cricket
TNPL 2025 : Oh Noo, हे काय करताय! एकदा, दोनदा नाही, तर तीनदा मिसफिल्ड, कर्णधार अश्विन हतबल; Video
TNPL 2025 Filding Blunder : क्रिकेटमध्ये अनेकदा क्षेत्ररक्षकांकडून चूका होतात, ज्याचा फायदा फलंदाज घेतात. पण एकाच चेंडूवर तब्बल तीनदा मिसफिल्ड झाल्याचे तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दिसून आले, जे पाहून आर अश्विनही हतबल झाला होता.
क्रिकेटमध्ये अनेकदा क्षेत्ररक्षकांकडून चूका होतात, ज्याचा फायदा फलंदाज घेतात. चेंडू पकडताना तो सुटतो किंवा फेकलेला चेंडू समोरचा क्षेत्ररक्षक घेत नाही. अशा काही गमतीशीर गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धाही सुरू आहे. या स्पर्धेतही अशा मजेशीर गोष्टी घडताना दिसत आहे.
नुकतेच सियाचेम मदुराई पँथर्स आणि दिंडीगुल ड्रॅगन्स संघात शनिवारी (१४ जून) सालेममध्ये सामना झाला. या सामन्यात एकाच चेंडूवर क्षेत्ररक्षकांनी तब्बल तीनदा चेंडू सोडला.