Tamil Nadu Premier League Chepauk Super Gillies beat Nellai Royal Kings : तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी चेपॉक सुपर गिलीज संघाने नेल्लाई रॉयल किंग्सवर ४१ धावांनी विजय मिळवला. स्वप्निल सिंगने अष्टपैलू कामगिरी करताना हा सामना गाजवला असला तरी एका घटनेमुळे या सामन्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या सामन्यात एक अविश्वसनीय आणि थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका फलंदाजाने चेंडूवर इतका जोरदार फटका मारला की, त्याच्या हातात असलेल्या बॅटीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बॅटीचा एक तुकडा थेट गोलंदाजाच्या दिशेने वेगाने गेला, अन्...