

Towhid Hridoy Double Century | Bangladesh vs West Indies
Sakal
Bangladesh vs West Indies, 2nd Test: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघात सध्या रोमांचक कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपचाही भाग आहे. या मालिकेतील दुसरा सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असून या सामन्याचा तिसरा दिवस तोहिद हृदोयने (Towhid Hridoy Double Century) गाजवला आहे.
त्याने नाबाद द्विशतक करत बांगलादेशला संकटातून अक्षरश: बाहेर काढले आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला आहे. त्यामुळे बांगलादेशला मालिका वाचवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजयाची आवश्यकता आहे.
मात्र वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १०६.४ षटकात ३५६ धावा ठोकल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून अमीर जंगूने १३३ धावा केल्या, तर केविन विकहॅमने ६१ धावांची, तर जस्टीन ग्रीव्ह्जने ५१ धावांची खेळी केली होती. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना हसन मेहमूदने ६ विकेट्स घेतल्या होत्या.