Melbourne young cricketer fighting for life after being struck by ball in nets
esakal
Melbourne cricketer fighting for life: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे आणि वन डे मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२०त यजमान ऑस्ट्रेलियाला पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. पण, त्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झूंज देतोय. ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी चेंडू त्याच्या डोक्यावर आदळल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि तो सध्या लाईफ सपोर्टवर आहे.