
Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्नमध्ये सुरू असलेला कसोटी मालिकेतील चौथा सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्यात भारतासाठी दिलासा मिळाला तो ट्रॅव्हिस हेडच्या बॅटमधून धावा झाल्या नाहीत. मात्र त्याने गोलंदाजीत त्याचे योगदान दिले आहे. त्याने ऋषभ पंतची महत्त्वाची विकेट घेतली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या दिवशी भारतासमोर ९२ षटकात हे लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
भारताने लंच ब्रेकपूर्वी तीन विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा (९), केएल राहुल (०) आणि विराट कोहली (५) हे स्वस्तात बाद झाले होते.