
The future of Indian cricket without Rohit Sharma and Virat Kohli
ब्रिस्बेन कसोटीचा निकाल ड्रॉ लागला आणि भारतीय ड्रेसिंग रूमचं वातावरण एकदम भावनिक झालं. महान फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय अश्विनने संघातील त्याची गरज ओळखली अन् नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेतली. कर्णधार रोहित शर्मासोबत तो पत्रकार परिषदेत आला. आज माझा भारतीय क्रिकेट संघासोबतचा शेवटचा दिवस, अशी घोषणा करून फार काही न बोलता गुपचूप निघून गेला.