
Australia vs India Day-Night Test at Adelaide: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेडने नेहमीच भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. त्याने शुक्रवारपासून ऍडलेड ओव्हलवर सुरू झालेल्या भारताविरूद्धच्या दिवस-रात्र कसोटीतही दमदार फलंदाजी करत शतक ठोकले. यासह त्याने खास विक्रमही केला. महत्त्वाचे म्हणजे ऍडलेड ओव्हल हेडचे घरचे मैदान आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका चालू असून ऍडलेडमध्ये दुसरा सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात तो स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.