
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड ओव्हलवर दिवस-रात्र प्रकारात खेळला जात आहे. या सामन्यात सध्या तरी ऑस्ट्रेलियन संघ वरचढ ठरताना दिसत आहे. पण असं असतानाच नितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला.
या कसोटीत भारतीय संघ १८० धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेर १ बाद ८६ धावा केल्या होत्या. त्यापुढे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी (७ डिसेंबर) खेळायला सुरुवात केली.