

Team India
Sakal
ऑक्टोबरच्या सुरुवातीला क्रिकेटमधील एक दुर्मिळ घटना भारतीय संघाबाबत पाहायला मिळू शकते. एकाच दिवशी भारतीय संघाचे दोन संघ सामना खेळण्याची दाट शक्यता आहे. खरंतर यापूर्वी अशी घटना घडली आहे, पण त्याला २८ वर्षे झाले आहेत.
१२ सप्टेंबर १९९८ रोजी भारताचे दोन संघ दोन ठिकाणी सामने खेळले होते. त्यादिवशी टोरोंटोमध्ये सहारा फ्रेंडशिप कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा सामना एका भारतीय संघाने खेळला होता, तर दुसऱ्या भारतीय संघाने त्याच दिवशी क्वालालंपूरमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सामना खेळला होता. म्हणजेच एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशात भारतीय संघ सामना खेळला होता.