Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Duleep Trophy Final 2026, Day 3 Updates: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचा अंतिम सामन्यात पूर्व विभागाने वर्चस्व मिळवले आहे. तिसऱ्या दिवस अखेरीस देवदत्त पडिक्कल आणि तिलक वर्मा यांच्या अर्धशतकांनंतरही दक्षिण विभाग मोठी पिछाडीवर आहे.
Tilak Varma | Duleep Trophy

Tilak Varma | Duleep Trophy

Sakal

Updated on

Duleep Trophy 2026 Final, East Zone vs South Zone: चेन्नईमध्ये दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग संघात सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसापर्यंत (मंगळवार, ८ सप्टेंबर) पूर्व विभागाचे वर्चस्व दिसून येत आहे. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) एकाकी झुंज लढत असला, तरी अद्याप दक्षिण विभाग तब्बल ४६६ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या दोन दिवसात पहिल्या डावात सर्वबाद ७०८ धावा केल्या होत्या. कर्णधार ईशान किशनने २७० धावांची खेळी केली, तर कुमार कुशाग्रने १०१ धावांची खेळी केली होती. तसेच अभिमन्यू ईश्वरन (७२) आणि शिखर मोहन (८५) यांनी अर्धशतके केल होती.

Tilak Varma | Duleep Trophy
Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com