Hardik Pandya will lead a star-studded Mumbai Indians squad in IPL 2026
esakal
MI strongest squad IPL 2026 Hardik Pandya captaincy: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे आणि ३१ मे रोजी फायनल होईल. देशातील काही प्रमुख राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्याने आयपीएल २०२६ चे वेळापत्रकही रखडले आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी किंवा शुक्रवारी आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या आयपीएल हंगामापूर्वी झालेल्या लिलावामुळे प्रत्येक संघात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. Mumbai Indians, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांची हवा आतापासून सुरू झाली आहे.