IND vs PAK U19: आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव, निखील कुमारची एकाकी झुंज व्यर्थ

U19 Asia Cup 2024 Pakistan Beat India: १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला. त्यामुळे भारताची या स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली आहे.
Nikhil Kumar Fifty
U19 Asia Cup 2024 India vs PakistanSakal
Updated on

U19 Asia Cup 2024, India vs Pakistan: १९ वर्षीय आशिया कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. भारताला शनिवारी (३० नोव्हेंबर) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे.

भारताकडून निखील कुमारने अर्धशतक करत झुंज दिली, मात्र त्याला बाकी कोणाची साथ मिळाली नाही. परिणामी भारताचा या सामन्यात ४३ धावांनी पराभव झाला आहे.

दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ४७.१ षटकात सर्वबाद २३७ धावा करता आल्या.

Nikhil Kumar Fifty
IND vs PAK U19: मुंबईचा फलंदाज Ayush Mhatre गोलंदाजीत चमकला; पाकिस्तानला १० धावांच्या फरकाने दिले दणके, भारताचे कमबॅक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com