Things Heat Up in Bulawayo! Vaibhav Sooryavanshi vs Zawad Moment Goes Viral
esakal
IND U19 vs BAN U19 handshake controversy at toss: भारत आणि बांगलादेश, या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये वाढलेल्या तणावाचे पडसाद १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-बांगलादेश लढतीत पाहायला मिळाले. कर्णधार आयुष म्हात्रे ( Ayush Mhatre) याने नाणेफेक करताना बांगलादेशचा कर्णधार अजिजुल हकिम याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यामुळे आता नवा वाद पेटला आहे. त्यात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) नेही आपल्या आक्रमक खेळीने बांगलादेशच्या गोलंदाजांना रडवले होते. त्यामुळे ते त्याला भिडले, काही काळासाठी सामन्यातील वातावरण तापले होते.