U19 World Cup semi-final scenario explained
esakal
How India can qualify for U19 World Cup semi-final: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा निर्णायक वळणावर आली आहे आणि सुपर सिक्सच्या फेरीत आता प्रत्येक संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. Super Six गटातून पाच संघांचे आव्हान संपुष्टात आले आहेत आणि सहा संघ अजूनही उपांत्य फेरीच्या उर्वरित ३ जागांसाठी शर्यतीत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे आणि सध्याच्या घडीला इंग्लंड, भारत व अफगाणिस्तान हे संघ या शर्यतीत आघाडीवर आहेत.