IND U19 VS BAN U19: वैभव सूर्यवंशीने टीपला सूर्या दादासारखा कॅच; बांगलादेशच्या हातून खेचली मॅच, भारताचा रोमहर्षक विजय

India U19 vs Bangladesh U19 Marathi News: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरला. या रोमहर्षक लढतीत वैभव सूर्यवंशी याने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. सामन्याच्या निर्णायक क्षणी वैभवने सूर्यकुमार यादवच्या आठवणी जागवणारा शानदार कॅच घेत बांगलादेशच्या हातातून सामना अक्षरशः खेचून आणला.\
Vaibhav Suryavanshi takes a stunning catch to seal India U19’s thrilling win over Bangladesh

Vaibhav Suryavanshi takes a stunning catch to seal India U19’s thrilling win over Bangladesh

esakal

Updated on

U19 World Cup Vaibhav Suryavanshi Pulls Off Match-Winning Catch : भारतीय संघाने १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी बांगलादेशविरुद्ध थरारक विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी या सामन्यात चमकला. त्याने प्रथम फलंदाजीत बहुमूल्य योगदान दिले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात आपली छाप पाडली. सूर्यकुमार यादवने २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टिपलेल्या झेलची पुनरावृत्ती वैभवने आजच्या सामन्यात केली. २६ व्या षटकात त्याने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने सामन्याला कलाटणी मिळाली आणि भारताने DLS नुसार ही मॅच जिंकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com