
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने (UAE) बुधवारी (२१ मे) मोठा कारनामा केला आहे. आयसीसीचे सहसदस्य असलेल्या युएईने बांगलादेशविरुद्ध टी२० मालिकेतील तिसरा सामना ७ विकेट्सने जिंकला. यासोबतच युएईने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
युएईने या मालिकेतील दुसरा सामना २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना जिंकला होता. त्यामुळे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर युएईने नंतरचे दोन्ही सामने जिंकत मालिका जिंकण्याचा कारनामा करून दाखवला.