
सोमवारी (१९ मे) संयुक्त अरब अमिरातीने (UAE) बांग्लादेश संघाला टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणका दिला. शारजामध्ये झालेल्या या सामन्याच युएईने २ विकेट्स आणि १ चेंडू राखून रोमांचक विजय मिळवला. या विजयासह युएईने ऐतिहासिक विक्रमक केले आहेत आणि मालिकेत १-१ अशी बरोबरीही केली आहे.
युएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशकडून सलामीवीर तान्झिद हसन आणि कर्णधार लिटन दासने दमदार सुरुवात केली होती. त्यांनी ९० धावांची भागीदारी केली.