
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांनी ११ सामन्यात आत्तापर्यंत फक्त दोन सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हानही संपले आहे.
अशातच त्यांना या हंगामात काही खेळाडूंच्या दुखापतींचा फटकाही बसला. त्यांच्या संघातील कर्णधार ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे संघातून बाहेर व्हावं लागलं. परंतु, त्यांच्या जागेवर आलेल्या बदली खेळाडूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.