पाकिस्तानला भारताशी पंगा घेणं अवघड जातंय... भारतीय सैन्याचा पलटवार पाहून आधीच पाकिस्तानी सरकारमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात या युद्धामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही ( PCB) धक्का बसला आहे. भारत-पाकिस्तान युद्धामुळे पीसीबीने पाकिस्तान सुपर लीग ( PSL) चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवणार असल्याची योजना आखली होती. मात्र, दोन देशांमधील तणाव पाहता अमिराती क्रिकेट बोर्डाने ( ECB) पीएसएल आयोजनाची विनंती फेटाळल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. अद्याप ECB कडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.