Asia Cup 2025 स्पर्धेसाठी अखेरचा संघ निश्चित! ओमानमधील स्पर्धा जिंकत या संघाने मिळवले मिळवलं तिकीट

Asia Cup 2025 Qualifier: पुढील वर्षी आशिया कप 2025 स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभागी होणारा अखेरचा संघ निश्चित झाला आहे.
UAE Cricket
UAE CricketSakal

Asia Cup 2025: पुढील वर्षीय टी20 आशिया कप 2025 स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाने पात्रता मिळवली आहे. त्यामुळे पुढीलवर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत युएईचा संघही खेळताना दिसणार आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी एकच जागा रिकामी होती, ज्यासाठी ओमानमध्ये एसीसी प्रीमियर कप ही स्पर्धा नुकतीच खेळवण्यात आली. एकूण 10 संघात झालेल्या या स्पर्धेत युएईने रविवारी (21 एप्रिल) झालेल्या अंतिम सामन्यात ओमानला 55 धावांनी पराभूत केले.

त्यामुळे युएईने आशिया कप 2025 साठी हक्क सांगितला आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानही खेळणार आहेत.

असा झाला अंतिम सामना

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे युएईने प्रथम फलंदाजी केली. युएईने 20 षटकात 4 बाद 204 धावा केल्या आणि ओमानसमोर 205 धावांचं मोठं आव्हान ठेवले.

UAE Cricket
IPL 2024 : RCB च्या पराभवावर गौतम गंभीरने केलं ट्विट, काय म्हणाला केकेआरचा मार्गदर्शक?

युएईकडून कर्णधार मुहम्मद वसीमने शानदार शतक केले. त्याने 56 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. त्याने ही खएळी करताना अलिशन शराफुसह 93 धावांची सलामी भागीदारी केली.

शराफु 34 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विष्णू सुकुमारनबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. सुकुमारन 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर शतक करून वसीमनेही विकेट गमावली. पण अखेरीस असीफ खानने 16 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी करत संघाला 200 पार नेले.

ओमानकडून बिलाल खानने 2 विकेट्स घेतल्या,तर शकिल अहमद आणि कर्णधार झिशन मकसूद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

UAE Cricket
Team India T20 WC24 : IPL ची आकडेवारी पाहता हार्दिक पांड्या अन् KL राहुलचा टी-20 वर्ल्ड कप संघातून पत्ता कट?

त्यानंतर 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानला 20 षटकात 9 बाद 149 धावाच करता आल्या. ओमानची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 11 धावांतच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

पण नंतर प्रतिक अठवले (49), खालीद कैल (30) आणि फयाझ बट (23*) यांनी छोटेखानी खेळी करत संघाला 140 धावांचा टप्पा पार करून दिला. परंतु, कोणालाही मोठी खेळी करून संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. प्रतिकचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले.

युएईकडून जुनैद सिद्दकीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर मुहम्मद फारुक आणि आयान अफझल खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच बासिल हमीदने 1 विकेट घेतली.

UAE Cricket
Virat Kohli : चेंडू कमरेच्या वर असतानाही विराटला का दिला आऊट, काय आहे नियम? डोके न खाजवता समजून घ्या

ओमानसाठी उघडला एमर्जिंग एशिया कपचे दरवाजे

दरम्यान हा पराभव ओमानसाठी अगदीच निराशा देणारा ठरला नाही. कारण अंतिम सामन्यात स्थान मिळवत त्यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्यासह युएई आणि हाँग काँगनेही पात्रता मिळवली आहे.

हाँग काँगने एसीसी प्रीमियर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात नेपाळला 4 विकेट्सने पराभूत केले आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या पाच संघांचे अ संघही खेळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com