Devon Conway Responds with Stunning 178 for New Zealand vs West Indies 3rd Test
esakal
New Zealand perfect start third Test West Indies: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी झालेल्या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना अनसोल्ड रहावे लागले.. त्यामध्ये डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway)हेही नाव आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने आयपीएल गाजवले आहे, परंतु यंदाच्या लिलावात त्याच्यासाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. पण, याने हताश न होता, न्यूझीलंडसाठी त्याने अविस्मरणीय खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत कॉनवे व कर्णधार टॉम लॅथम यांनी ३२३ धावांची सलामी दिली.