

Gautam Gambhir - Team India
Sakal
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत रविवारी (१८ जानेवारी) लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने इंदोरला झालेला वनडे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना ४१ धावांनी जिंकला आणि भारताविरुद्ध २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. न्यूझीलंडचा ३७ वर्षांतील भारतातील पहिलाच वनडे मालिका विजय ठरला आहे. त्यामुळे २०२६ वर्षाची सुरुवात भारतीय संघासाठी (Team India) मात्र फारशी खास ठरली नाही.
न्यूझीलंडचा हा विजयही ऐतिहासिक ठरला. या विजयाने न्यूझीलंडने पुन्हा दीड वर्षांपूर्वीच्या कसोटी मालिकेतील मानहानिकारक पराभवाची आठवण भारतीय चाहत्यांना करून दिली. २०२४ च्या अखेरीस न्यूझीलंडने भारतीय संघाला मायदेशात कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला होता.
तथापि, रविवारच्या पराभवानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.