
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १८ वा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सुरू आहे. लखनौ येथे होत असलेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने इतिहास रचला आहे. युपीने बंगळुरूच्या गोलंदाजांना चांगलंच सतवलं. युपीने बंगळुरूसमोर तब्बल २२६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पण युपीच्या जॉर्जिया वॉलचं शतक मात्र थोडक्यात हुकलं.