
Kiran Navgire’s record-breaking knock in WPL 2025 for UP Warriorz : महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणाऱ्या पुण्याच्या किरण नवगिरेला आज महिला प्रीमिअर लीगमध्ये ( WPL 2025) सलामीवीर म्हणून बढती दिली गेली. यूपी वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरणने या संधीचं सोनं केलं आणि दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिच्या फटकेबाजीमुळे यूपी संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा पॉवर प्लेमधील आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर नोंदवला. यूपी वॉरियर्सने पॉवरप्लेमध्ये ६६ धावा केल्या.