RJ Mahvash responds strongly to troll accusing her: भारताचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याच्यासोबत सध्या नेहमी दिसणाऱ्या आरजे महवशने काल एका ट्रोलर्सना चांगलेच सुनावले. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पंजाब किंग्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये ६ धावांनी पंजाबला पराभूत केले. रेडिओ जॉकी महवशने त्यानंतर सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात तिने युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याच्याबद्दल लिहिले. त्यावरून एका ट्रोलरने तिला ट्रोल केले आणि तिचा संताप अनावर झाला.