
स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग भारताच्या टी२० संघातील नियमित खेळाडू आहे. नुकताच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याने ८ जून रोजी खासदार प्रिया सरोजसोबत साखरपूडा केला आहे. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी कुटुंबाच्या सहमतीने साखरपूडा केला असून आता फेब्रुवारी २०२६ मध्ये ते लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
यातच आता रिंकू सिंगला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याला उत्तर प्रदेश सरकारकडून नोकरी मिळाली आहे.