VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

VAIBHAV SOORYAVANSHI RECORDS: अवघ्या १५ वर्षांच्या वयात वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ क्रिकेट, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील १७५ धावांची खेळी, आयपीएलमधील शतक आणि दुलीप ट्रॉफीतील विक्रमामुळे त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

VAIBHAV SOORYAVANSHI RECORDS: माणसाकडे जर टॅलेंट असेल, तर वय कितीही कमी असलं तरी त्याची कामगिरीच त्याचं उत्तर देते. असंच काहीसं वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत घडलं आहे. २०२६ हे वर्ष वैभवसाठी खूप चांगलं ठरलं आहे. आयपीएल २०२६च्या हंगामात सर्वाधिक धावा करत त्याने ऑरेंज कॅपसह अनेक मोठे पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

त्याचबरोबर अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने ८० चेंडूंत १७५ धावांची तुफानी खेळी करत भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com