Vaibhav Sooryavanshi: रोहितसोबत वैभव सूर्यवंशीनेच सलामीला यावं! माजी दिग्गजाचा मोठा सल्ला, गिलबाबतही केलं मोठं वक्तव्य

Former cricketer backs Vaibhav Sooryavanshi as opener: झिम्बाब्वे मालिकेत 151 धावांसह मालिकावीर ठरलेल्या वैभव सूर्यवंशीला आता भारताच्या एकदिवसीय संघात स्थान द्यावे, अशी मागणी फारुख इंजिनियर यांनी केली आहे. त्यांनी रोहित शर्मासोबत त्याने सलामीला यावे, असेही मत व्यक्त केले.
Vaibhav Sooryavanshi should open with Rohit Sharma

Vaibhav Sooryavanshi should open with Rohit Sharma

esakal

Updated on

Farokh Engineer wants Vaibhav Suryavanshi in India ODI team: 15 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे मालिकेत धडाकेबाज कामगिरी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने या मालिकेत मालिकावीर पुरस्कार जिंकत इतिहास रचला. तीन सामन्यांत त्याने 151 धावा केल्या, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता.

वैभव सूर्यवंशीला आता 2027 च्या एकदिवसीय संघातही स्थान द्यायला हवं, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी दिला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, रोहित शर्मासोबत वैभवने सलामीला यावं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com