VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा इंग्लंडचा माजी कर्णधारही फॅन! अलिस्टर कुकने केलं मोठं भाकीत, म्हणाला...

Vaibhav Sooryavanshi Alastair Cook: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कुकही प्रभावित झाला आहे. वैभवमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होण्याची क्षमता असल्याचं कुकने म्हटलं आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on: 

Vaibhav Sooryavanshi Alastair Cook: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. अगदी कमी वयात त्याने आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमध्ये मोठी छाप पाडली आहे. त्याच्या फलंदाजीची भुरळ आता परदेशी खेळाडूंनाही पडू लागली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कुकही वैभवच्या खेळाने प्रभावित झाला आहे. वैभवमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होण्याची क्षमता असल्याचं कुकने म्हटलं आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटप्रमाणेच त्याने कसोटी क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...