Vaibhav Sooryavanshi smashed a 16-ball fifty against UAE in the Rising Stars Asia Cup, becoming the first batter to score two List A fifties in 16 balls or fewer.
esakal
India A vs UAE Asia Cup Rising Stars : भारतासाठी करो वा मरो सामन्यात वैभव सूर्यवंशीची ( Vaibhav Sooryavanshi) बॅट तळपली. २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने पहिल्या षटकात सलग तीन षटकार खेचून आपला इरादा स्पष्ट केला. या दौऱ्यावर त्याला मागील दोन सामन्यांत २६ व ११ धावाच करता आल्या होत्या. त्यात पाकिस्तानविरुद्ध आलेल्या अपयशामुळे वैभव प्रचंड नाराज होता आणि आज त्याने नाराजीचा सर्व राग यूएईच्या गोलंदाजांवर काढला. त्याने १६ चेंडूंत ८ षटकार व १ चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.