वैभव सूर्यवंशीपासून हरमनप्रीत कौरपर्यंत... TIME Magazine च्या प्रतिष्ठित यादीत भारताच्या नऊ खेळाडूंना स्थान

Vaibhav Sooryavanshi honoured in TIME 100 Next India list: अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम मॅगझीनने भारतातील भविष्य घडवणाऱ्या १०० असामान्य व्यक्तींची TIME 100 Next India ही विशेष यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताच्या क्रीडा क्षेत्रातील नऊ दिग्गज आणि युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi honoured in TIME 100 Next India list

esakal

Updated on: 

नवी दिल्ली, ता. १९ : अमेरिकेतील टाइम मॅगझीनच्या वतीने भारतातील विविध क्षेत्रांमध्ये भविष्य घडवणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, क्रिकेट विश्वकरंडक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, ऑलिंपिक पदकविजेती बॉक्सर लव्हलीना बोर्गोहेन, वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्यासह भारताच्या नऊ क्रीडा ताऱ्यांचा समावेश ‘टाइम १०० नेक्स्ट इंडिया’ या यादीत करण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या यादीत बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश, महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर विथ्या रामराज, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती तिरंदाज कुमकुम मोहोद, महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता पुनिया आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांचाही समावेश आहे. देशाचे भविष्य घडवणाऱ्या १०० असामान्य नेत्यांचा

Loading content, please wait...