IND vs NZ 1st T20I Christchurch pitch report and playing XI predictions
India vs New Zealand first T20I weather and pitch report: भारतीय संघाला न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर नेहमी संघर्ष करताना पाहिले गेले आहे. भारतातील अन् येथील खेळपट्ट्या, यांत जमीनआसमानाचा फरक दिसतो आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडताना दिसतात. पण, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ कोणत्याही मैदानावर आपला दबदबा सिद्ध करू शकतो, तेवढी धमक त्यांच्यात आहे. अशात ख्राईस्टचर्चची खेळपट्टी फलंदाजांची परीक्षा घेणारी असेल आणि त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार श्रेयस अय्यर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवण्याचा विचार करावा लावू शकते.