Gautam Gambhir on Vaibhav Sooryavanshi selection
esakal
Vaibhav Sooryavanshi India return latest news: भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत अफगाणिस्तानवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा संघ Asian Games साठी जपानला रवाना होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तिसऱ्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण, अर्शदीप सिंगच्या जागी यश ठाकूर हा एकमेव बदल संघात पाहायला मिळाला आणि वैभवचे चाहते निराश झाले. मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) जेव्हा पत्रकार परिषदेत आला, तेव्हा त्याला वैभवचा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने दिलेले उत्तर चकित करणारे होते.