Vaibhav Sooryavanshi : पोट्ट्याची मोठी झेप! वैभव ICC Ranking मध्ये २३० स्थानांनी पुढे आला; बघा जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला?

Vaibhav Sooryavanshi ICC T20I batting rankings: भारतीय क्रिकेटचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने तब्बल २३० स्थानांची झेप घेतलीआहे.
Vaibhav Sooryavanshi ICC T20I batting rankings

Vaibhav Sooryavanshi jumps 230 places in ICC rankings

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi latest ICC ranking update: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत गरुड झेप घेतली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा करून प्लेअर ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकणाऱ्या वैभवला आयसीसीने भेट दिली आहे. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून सांघिक क्रमवारीत नंबर १ स्थान पुन्हा काबीज केले होते. वैभवने फलंदाजांच्या क्रमवारीत २३० क्रमांनी झेप घेतली आणि तो कारकिर्दीतील त्याच्या सर्वोत्तम ४८ व्या क्रमांकावर आला आहे. भारतीय फलंदाज इशान किशन हा पुन्हा नंबर १ वर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com