Vaibhav Sooryavanshi Next Match : वैभव सूर्यवंशीचा पुढील सामना केव्हा? भारतासमोर Asia Cup च्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान; मॅच Live कुठे पाहता येणार?

India A vs Sri Lanka A Semi-Final Live Telecast And Streaming Details : UAE विरुद्ध ५३ चेंडूंत २०४ धावांची विश्वविक्रमी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी आता आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत श्रीलंका अ विरुद्ध खेळणार आहे. पण, हा सामना केव्हा व कुठे होणार आहे?
India A vs Sri Lanka A Semi-Final Live Telecast And Streaming Details

India A vs Sri Lanka A Semi-Final Live Telecast And Streaming Details

esakal

Updated on: 

India A vs Sri Lanka A semi final 2026 live streaming: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi Next Match) आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेत मंगळवारी त्सुनामी आणली. यूएईच्या २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने २०४ धावांची विश्वविक्रमी खेळी केली. त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील वेगवान अर्धशतक, वेगवान १५० धावा, वेगवान द्विशतक असे सहा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले. त्याच्या ५३ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार व तब्बल २८ षटकार आहेत. वैभवच्या या वादळाने भारताला १४.२ षटकांत ३ बाद २५४ धावा करून विजय मिळवून दिला. आता सूर गवसलेल्या वैभवचा खेळ पुन्हा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, भारत अ संघाचा पुढील सामना कधी व कुठे आहे?

Loading content, please wait...