Vaibhav Sooryavanshi not in India Test plans currently
esakal
Big Setback For 15-Year-Old Vaibhav Sooryavanshi : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता घराघरात पोहोचला आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी लोकं टीव्हीसमोर गर्दी करत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी तर वैभवसाठी त्यांची पत्नी दुलीप ट्रॉफी पाहायला लागली, असे म्हटले. वैभवने इंग्लंड दौऱ्यातून सीनियर ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले. त्याने तात्पुरता वंडर बॉय होण्यापेक्षा अधिक मेहनत घ्यावी आणि सातत्य राखावे, असा सल्लाही त्याला दिला जातोय. माजी फलंदाज राहुल द्रविडनेही वैभवला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मेहनत घेण्याचा सल्ला दिला आहे. अशात त्याला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.