

IND vs NZ 3rd T20
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI OPENING WITH SANJU SAMSON: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकाऐवजी सलामीला पाठवावं आणि अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावं, असं त्याने म्हटलं आहे. यामुळे डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची जोडीही कायम राहील आणि वैभवला सलामीला खेळण्याची संधी मिळेल, असं आकाश चोप्राचं म्हणणं आहे.