Robin Uthappa compares Vaibhav Sooryavanshi to Don Bradman
esakal
Robin Uthappa compares Vaibhav Sooryavanshi with Don Bradman: १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी ज्या आक्रमकतेने खेळतोय, ते पाहून चांगल्या गोलंदाजांनाही घाम फुटलेला, पाहायला मिळाला आहे. आयपीएल, १९ वर्षांखालील क्रिकेट, लिस्ट ए क्रिकेट गाजवणाऱ्या वैभवला इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या सीनियर संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्यात काही खास कामगिरी करता आली नसली तरी त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर सर्व कसर भरून काढली. तीन सामन्यांत १५१ धावा करून मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार त्याने जिंकला. वैभवची जगभरात चर्चा सुरू असताना भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने त्याची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली आहे.