

Dilip Vengsarkar advice to Vaibhav Sooryavanshi:
esakal
Dilip Vengsarkar advice to Vaibhav Sooryavanshi: भारत आणि आयर्लंड यांच्यात सध्या दोन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची जोरदार चर्चा होती.
मात्र, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी त्याला अंतिम अकरामध्ये संधी दिली नाही. वैभवच्या पदार्पणाबाबत चर्चा सुरू असतानाच भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी त्याच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते, वैभवमध्ये प्रचंड क्षमता आहे. मात्र, मोठा क्रिकेटपटू बनायचं असेल तर त्याने सचिन तेंडुलकरचे काही गुण आत्मसात केले पाहिजेत.