Vaibhav Sooryavanshi creates history with a record-breaking 28-ball century against UAE, become the fastest centurion in List A cricket
esakal
Vaibhav Sooryavanshi 28 ball hundred against UAE : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अखेर मरगळ झटकून टाकणारी खेळी केली. आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेत वैभवला मागील दोन सामन्यांत काही खास करता आले नव्हते. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरल्याची सल त्याला टोचत होती. त्याने तो सर्व राग यूएईविरुद्धच्या सामन्यात काढला. १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला... लिस्ट ए क्रिकेटमध्ये दोनवेळा १६ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने शतकाला गवसणी घातली.