Vaibhav Sooryavanshi takes on Mohammed Siraj with brilliant strokeplay
esakal
Duleep Trophy Final 2026 East Zone vs South Zone : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. पण, यावेळी वैभवची आक्रमक खेळी खास ठरली, कारण त्याच्यासमोर भारताचा बेस्ट गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) होता. वैभवने काही सुरेख फटके मारून सिराजलाही हैराण केले. पूर्व विभागाकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने अभिमन्यू इश्वरणसह शतकी सलामी दिली आणि दक्षिण विभागाच्या गोलंदाजांना चोप दिला.