Gautam Gambhir with Sanju Samson and Vaibhav Sooryavanshi.
Will Vaibhav Sooryavanshi open for India in third T20I? भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाणार आहे आणि या सामन्यातून इशान किशनने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला आणखी एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार हे निश्चित आहे. भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे आणि त्यांना मालिका जिंकण्यासाठी उर्वरित ३ सामन्यांपैकी एक विजय पुरेसा आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोग पाहायला मिळू शकतात.. त्याचाच एक भाग म्हणून वैभवला मंगळवारी होणाऱ्या सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.