Aman Rao Perala fastest century in Telangana T20 League
esakal
Can Aman Rao Perala replace Yashasvi Jaiswal in IPL? १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी मैदान गाजवत असताना राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून आणखी एख स्फोटक फलंदाज तयार झाला आहे. वैभवने दोन दिवसापूर्वी श्रीलंका अ संघाविरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम नावावर केला होता आणि तो आता आयर्लंड मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अशात त्याच्या RR संघातील भीडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतीयांमध्ये सर्वात वेगवान ट्वेंटी-२० शतकाचा विक्रम नावावर केला. RR च्या विविध पोस्ट नुसार २२ वर्षीय अमन राव पेराला याने तेलंगणा ट्वेंटी-२० लीगमध्ये ३२ चेंडूंत शतक पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जाणार असल्याची चर्चा असताना अमनची ही फटकेबाजी फ्रँचायझीसाठी आश्वासक ठरतेय.