Vaibhav Suryavanshi creates history at the ICC U19 World Cup 2026
esakal
India U19 World Cup 2026 Vaibhav Suryavanshi performance: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. बांगलादेशविरुद्धचा हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार १८ धावांनी जिंकला. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आणला होता, परंतु वैभवला ( Vaibhav Sooryavanshi ) विश्वविक्रम रचण्यापासून पाऊस रोखू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताने सुपर सिक्समधील स्थआन पक्के केले आणि २४ तारखेला साखळी फेरीतील शेवटच्या लढतीत भारताला न्यूझीलंडचा सामना करायचा आहे.