Vaibhav Suryavanshi’s captaincy debut didn’t go as planned as he scored just 11 runs
esakal
IND U19 vs SA U19 first youth ODI Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचे भारताच्या युवा संघाचा कर्णधार म्हणून आज पदार्पण झाले. आयुष म्हात्रेला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे कर्णधारपदाची माळ वैभवच्या गळ्यात पडली आणि भारताच्या युवा संघाचे नेतृत्व करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. पण, हे कर्णधारपदाचे दडपण त्याला झेपवले नाही आणि तो पहिल्या सामन्यात अपयशी ठरला.